¡Sorpréndeme!

भाजपवर नवा आरोप: पक्षप्रवेशासाठी भाजपकडून 5 कोटींची ऑफर | BJP Latest News

2021-09-13 0 Dailymotion

शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला पाच कोटी रुपये आणि विधान परिषदेवर घेण्याची ऑफर दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हि ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील आणि आपली भेट झाली होती. यावेळी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच आमंत्रण दिलं. त्याबदल्यात पाच कोटी रुपये देण्याचं आणि विधान परिषदेवर घेण्याची ऑफरही पाटील यांनी दिली असं जाधव म्हणाले. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ आपल्या एकट्यालाच नव्हे तर 25 आमदारांनाही पाटील यांनी हि ऑफर दिल्याचा दावा जाधवांनी केला आहे. जाधव यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आता चंद्रकांत पाटील ह्याला काय उत्तर देतील ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews